🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनंतर काल त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फटाके, फुगड्या, अशा अनेक पद्धतींद्वारे लोकांनी काल आनंद व्यक्त केला. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना डिवचलं आहे.
जो निर्णय आला तो मान्य करायला हवा, जामीन झाला काय किंवा इतर बाबी झाल्या काय, यावर आम्हाला बोलायचं नसतं, खुनाच्या आरोपीलाही जामीन मिळतो, त्यांना त्यांच्या परीने आनंद साजरा करू द्या. आम्ही आमच्या परीने काय करायचं ते करू. आम्ही आताच काही सांगत नाही, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं, असा गौप्सस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.
यादरम्यान, मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही, मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे, माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?, असं म्हणत संजय राऊत चांगलेच बरसले आहेत.
दरम्यान, ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे, आता रडायचं नाही, आता लढाई सुरु झालीय. आता संपायचं नाही. 103 दिवस तुरुंगात राहीलो. 103 आमदार निवडून येणार. प्रत्येक संकट ही संधी आहे. मी शंभर दिवस तुरुंगात राहीलो. मला माहिती होतं की प्रत्येक कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळू शकतं, असं देखील राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
- Sanjay Raut | “… अन् ठाकरेंचा उर भरुन आला”, जामीननंतर संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचा फोन
- Sanjay Raut | “माझ्या अटकेचे आदेश…”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- Aravind Sawant | “झुकले ते मिंध्ये, संजय राऊत खऱ्या अर्थानं जिंदे”; अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
- Sanjay Raut । “संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आणि अवैध” ; मुंबई हायकोर्टाची मोठी टिप्पणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
