Sanjay Raut | मुंबई : पत्राचाळ (Patrachawl Scam) घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ दिवस अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अखेर जामीन झाला आहे. मोठ्या जल्लोषात संजय राऊतांचा जामीन साजरा करण्यात आला होता. यानंतर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. न्यायालयाने राऊतांची अटक बेकाय असल्याचं म्हटलं आहे.
माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं, असा गौप्सस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.
यादरम्यान, मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही, मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे, माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?, असं म्हणत संजय राऊत चांगलेच बरसले आहेत.
दरम्यान, ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे, आता रडायचं नाही, आता लढाई सुरु झालीय. आता संपायचं नाही. 103 दिवस तुरुंगात राहीलो. 103 आमदार निवडून येणार. प्रत्येक संकट ही संधी आहे. मी शंभर दिवस तुरुंगात राहीलो. मला माहिती होतं की प्रत्येक कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळू शकतं, असं देखील राऊत म्हणाले.
तसेच, मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोरी पेडणेकरांना त्रास देत आहेत. काल भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी चालू आहे. करु द्या, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aravind Sawant | “झुकले ते मिंध्ये, संजय राऊत खऱ्या अर्थानं जिंदे”; अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
- Sanjay Raut । “संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आणि अवैध” ; मुंबई हायकोर्टाची मोठी टिप्पणी
- T20 WC IND vs ENG Semi Final | भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल होणार? उद्या फैसला
- Aditya Thackeray | अब्दुल गद्दार, म्हणत आदित्य ठाकरे आक्रमक! स्टेजच्या खाली उतरून भाषण
- Deepali Sayyed | “…तरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा” ; दीपाली सय्यद यांच्या प्रवेशावर भाजपचा आक्षेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

