Share

Sanjay Raut | “… अन् ठाकरेंचा उर भरुन आला”, जामीननंतर संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचा फोन

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय रऊत (Sanjay Raut) यांना काल जामीन मिळाला आहे. त्यांच्या जामीनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये नक्की काय संभाषण झालं याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

यादरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचं समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीत असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. यानंतर, जेलमधून सुटल्यावर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझ्याशी बोलले. यावेळी त्यांचा उर भरुन आला. मलाही भरुन आलं, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा परिवार आहे. रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबून मला अभिवादन करत नव्हते तर शिवसेनेला अभिवादन करत होते. संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली.

माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं, असा गौप्सस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

यादरम्यान, मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही, मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे, माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?, असं म्हणत संजय राऊत चांगलेच बरसले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!