🕒 1 min read
Aravind Sawant | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर झाला आहे. चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा जामीन महत्वाचा मानला जात आहे. यावर खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“संजय राऊतांनी त्याग आणि निष्ठा म्हणजे काय हे दाखवून दिलं”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी दिली आहे. सावंत म्हणाले, खूप खूप आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे राऊत हे निष्ठावंत व कडवट कार्यकर्ते आहेत. झुकेंगे नही, असं ते म्हणत होते. न्यायालयानं त्यांना जामीन दिला. याचा खूप आनंद झाला आहे.
इतका छळवाद त्यांनी सहन केला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढ कमी आहे. झुकले ते मिंध्ये, संजय राऊत खऱ्या अर्थानं जिंदे असल्याचं म्हणत अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदे गटाला टोला लगावला आहे.
दरम्यान, ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामिनाला विरोध केला. ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने निर्णय देत ईडीला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) खूप महत्त्वाची टिप्पणी केलीय. संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut । “संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आणि अवैध” ; मुंबई हायकोर्टाची मोठी टिप्पणी
- T20 WC IND vs ENG Semi Final | भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल होणार? उद्या फैसला
- Aditya Thackeray | अब्दुल गद्दार, म्हणत आदित्य ठाकरे आक्रमक! स्टेजच्या खाली उतरून भाषण
- Deepali Sayyed | “…तरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा” ; दीपाली सय्यद यांच्या प्रवेशावर भाजपचा आक्षेप
- PAK Vs NZ | पाकिस्तान विश्वचषक फायनलमध्ये! न्यूझीलंडचा 7 विकेट्सने केला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
