🕒 1 min read
Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेने देशातील अनेकांची मनं जिंकली. ही यात्रा कर्नाटक भागात झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जण या यात्रेची वाट बघत असतानाच ही यात्रा आता महाराष्ट्रात होणार आहे. येत्या 7 नोव्हेंबर ला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल होणार आहेत. तर ही यात्रा ११ दिवसांची असणार आहे. मात्र, मोठा प्रश्न उपस्थित होतोय हो म्हणजे या यात्रेत राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांसारखे ज्येष्ठ नेते यामध्ये सहभागी होणार का.
देगलुर मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होणार असून देगलूर नगर परिषदेतर्फे सत्कार होणार आहे. तसेच यात्रेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. यात्रेला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद देखील मिळत आहे. राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. रोज ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सभा आणि कॉर्नर मीटिंग होईल.
नांदेड शहरातील देगलुर नाका येथून पदयात्रेला सुरुवात सुरू होईल, नंतर नवीन मोंढा मैदानावर सभा होईल. या यात्रेमुळे नाव इतिहास निर्माण होणार आहे, जगभरात या यात्रेची दखल घेतली जात आहे.
रोज 24 ते 25 किलोमिटर पदयात्रा राहणार, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सामील होणार. शिवाय समविचारी पक्षाचे कार्यकर्ते देखील सामील होणार आहेत. दररोज सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात होणार, सायंकाळी 7 वाजेपर्यंत यात्रा संपणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amar Rajurkar । “आमच्याकडे होते तेव्हा ते बरे होते, तिकडे जाऊन बिघडले”; काँग्रेस आमदाराची अब्दुल सत्तारांवर टीका
- Devendra Fadanvis । फडणवीसांनी थेट इलॉन मस्कला केलं रिट्वीट, म्हणाले…
- Sushma Andhare । “ये डर मुझे अच्छा लगा”; सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदे गटाला टोला
- Gulabrao Patil । “उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही” ; गुलाबराव पाटलांचा टोला
- Bachchu Kadu and Ravi Rana | अखेर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
