Share

Devendra Fadanvis । फडणवीसांनी थेट इलॉन मस्कला केलं रिट्वीट, म्हणाले…

Published On: 

Devendra Fadanvis । मुंबई  ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क बनल्यापासून ते काय निर्णय घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात त्यांनी अनेक बदलही केले आहेत. त्यातीलच एक बदल म्हणजे भारतातील 52,141 अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या काळात ही खाती बंद करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आक्षेपार्ह माहिती शेअर केली होती. यामुळे त्यांचं ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं होतं.

यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरवर पुनरागमन होईल का? याबाबतच्या प्रश्नांचा भडिमार इलॉन मस्क यांच्यावर केला जात आहे. या संदर्भात इलॉन मस्क यांनी एक मिश्किल ट्वीट केलं आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरवर पुनरागमन होणार का? या प्रत्येक प्रश्नासाठी मला प्रत्येक वेळी मला एक डॉलर मिळाला असता, तर ट्विटर पैशात खेळलं असतं” असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं. हेच ट्वीट रिट्वीट करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

“विरोधक व एचएमव्हीकडून माझ्या आणि पक्षाविरोधात पसरवल्या जाणाऱ्या प्रत्येक खोट्या बातमीसाठी मला एक रुपाया मिळाला असता, तर भाजापाने खोऱ्याने पैसे ओढले असते” असं ट्वीट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, त्यांनी ‘फेक नरेटिव्ह’चा मुद्दा मांडला होता. तसेच पत्रकारांना उद्देशून त्यांनी ‘एचएमव्ही’ असा शब्द वापरला होता. देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्विट बरंच चर्चेत आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!