Share

Sushma Andhare । “ये डर मुझे अच्छा लगा”; सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदे गटाला टोला

Published On: 

Sushma Andhare । जळगाव: महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) मंगळवारी जिल्ह्यात आल्या. याअनुषंगाने जळगावात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख तीन महिन्यांचं लहान बाळ असा केला होता. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

त्या म्हणाल्या, मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना लगावला.

महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी भाष्य केलंय. “ये डर मुझे अच्छा लगा”, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही.

कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नसल्याचं अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!