🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commision) या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोट निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आयोगाच्या (निवडणूक आयोग) या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली असल्याचं समोर आलं आहे.
उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी –
उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाकरेंच्या या नावाला आता परवानगी मिळाणार का याकडे पाहणं महत्वाचं राहिल.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.तसेच, आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवीन नावाची आणि नवीन निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचे नेते मिलिंद नर्वेकर यांनी एक फोटो शेअर करत ठाकरे गटाचे चिन्ह काय असणार आहे, याची माहिती दिली आहे.मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये वाघ असून त्या वाघाच्या मागे जाळ असल्याचं दिसून येतं आहे. एवढंच नाहीतर त्यावर फोटोवर आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असंही लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “मुख्यमंत्रीपदापायी मती गेली अन्…”; भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- Uddhav Thackeray | निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- MNS | “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Milind Narvekar | ‘तो’ फोटो शेअर करत मिलिंद नार्वेकरांनी सांगितले ठाकरे गटाचे चिन्ह
- Rohit Pawar | निवडणूक आयोगाच्या निर्णयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
