🕒 1 min read
मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
आम्ही कुणाच्या मार्गात जात नाहीत, आमच्या मार्गात कुणी येऊ नये. जर आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं गोगावले म्हणाले. तुम्हाला धक्काबुक्की झाली का? असं विचारलं असता ते म्हणाले अरे हाड! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं गोगावले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Mahesh Shinde | “राजकारणाच्या विचारातील काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी” ; महेश शिंदेंची खोचक टीका
- Amol Mitkari | आम्हाला झालेली धक्काबुक्की म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार-अमोल मिटकरी
- Tomato Flu | राज्यात कोरोना, मंकीपाॅक्स नंतर आता ‘टोमॅटो फ्लू’ आजाराचा धोका
- Mahesh Shinde | विधानभवनातील धक्काबुक्कीवर महेश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, चौकशीची मागणी!
- Assembly Session 2022 | विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच आंदोलन

