मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाना प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ५० खोके एकदम ओकेचा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबल असून सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आले. यावेळी अमोल मिटकरी आणि महेश शिंदेंमध्ये धक्काबुक्की झाली. एवढंच नाही तर या राड्यामध्ये आई-बहिणीवरुन शिव्या देखील देण्यात आल्या. यावर प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महेश शिंदे म्हणाले, “विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आम्हाला घोषणा देत चिथावत होते. सातत्याने ते घोषणा देत होते. मात्र आम्ही सर्व आमदार आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेने आंदोलन करत होतो. हे आंदोलन सुरु असताना काही विधीमंडळ सदस्य, काही विधानपरिषद सदस्य पाठीमागून पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, धक्काबुक्की केली. हे त्यांचे वर्तन अशोभनीय आहे.”
आंदोलन दाबण्याचा प्रयत्न-
“गेल्या अडीच वर्षात जो गैरकारभार झाला. त्या गैरकारभाचा पर्दाफाश आम्ही मिडीयाच्या समोर करत होते, हे त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी आमचे लोकशाही पद्धतीने चाललेले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप महेश शिंदे यांनी केला आहे.
अमोल मिटकरी लोकशाहीवादी विचारांचा नेता नाही-
“अमोल मिटकरी यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्याच्या विचारातील काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे. आज त्यांची वर्तणूक मीडियाने पाहीली, संपूर्ण विधिमंडळाने पाहीली आहे. आम्ही शातं असताना आम्हाला धक्काबुक्की केली, ढकलण्यात आलं. अमोल मिटकरींनी आम्हाला ढकललं. मग पुढच्या गोष्टी सरु झाल्या. अमोल मिटकरी लोकशाहीवादी विचारांचा नेता नाही. त्यांचे जहाल आणि चुकीचे विचार आहेत. अशा लोकांपासून लोकशाहीला धोका आहे, अशा लोकांवर कारवाई झाली पाहीजे,” अशी मागणी महेश शिंदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’ ; नितेश राणेंचे विधानसभेत गंभीर आरोप
- Rupali Thombare | “धनगर अन् वंजारी समाजाचा एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री होऊ दिला नाही कारण…”, रुपाली ठोंबरे
- Ajit Pawar | पोलीस भरती कधी करणार? ; अजित पवार यांचा सरकारला प्रश्न
- Ajit Pawar | “आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही, मात्र शिंदे गट…” ; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Amol Mitkari | “आमच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या”; अमोल मिटकरी यांचा शिंदे गटावर आरोप


