🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने इंग्लंड क्रिकेटलाच नव्हे तर सर्वांना चकित केले आहे. स्टार खेळाडूच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोक आपापल्या परीने या स्टार खेळाडूला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सोमवारी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही त्याच्या निवृत्तीबाबत इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना आपले मत व्यक्त केले होते.
कोहलीने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘स्टोक्स, मी आतापर्यंत ज्या खेळाडूंविरुद्ध खेळलो आहे त्यामध्ये तू सर्वात प्रतिस्पर्धी खेळाडू आहेस. तुमचा आदर केलाच पाहिजे. त्याचबरोबर स्टोक्सनेही कोहलीबद्दल आपले मत मांडले आहे. इंग्लिश अष्टपैलू खेळाडू म्हणतो की, मैदानावरील त्याची उर्जा आणि वचनबद्धता त्याला नेहमीच आवडते.
स्टोक्स ‘स्काय स्पोर्ट्स’वर एका खास संभाषणात म्हणाला की, ‘विराट क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंपैकी एक राहील. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खेळताना मला खूप आनंद होतो. मी नेहमीच त्याची उर्जा आणि खेळाप्रती बांधिलकीचा चाहता आहे. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खेळणे म्हणजे काय ते कळते. फक्त तुमच्यासाठी नाही तर वरच्या स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हे महत्वाचे आहे.
स्टोक्स पुढे म्हणाला की, ‘मला खात्री आहे की आम्ही मैदानावर एकमेकांविरुद्ध आणखी क्रिकेट खेळू. विराटची प्रतिक्रिया ऐकून खूप छान वाटले.’ स्टोक्सने २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लिश संघाने विश्वचषकावार आपले नाव कोरले होते.
स्टोक्सने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत इंग्लंडसाठी १०५ सामने खेळताना ८८ डावांत ७४ बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एका डावात चार आणि एकदा पाच बळी घेण्याचा पराक्रमही आहे. फलंदाजीत त्याने संघाकडून १०५ सामने खेळताना ९० डावांत २९१९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन शतके आणि २१ अर्धशतके आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”,‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Deepali Sayed : “अजुनही वेळ गेलेली नाही, उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांनी…”; कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

