🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाचा मुक्काम आता पुढील काही दिवसांसाठी वेस्ट इंडीजमध्ये असणार आहे. इंग्लंडला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने पराभूत करून भारतीय संघ वेस्ट इंडीजला पोहचला आहे. या शुक्रवारपासून दोन्ही देशांमधील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. अतिरिक्त ताणतणावामुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलवर अलीकडेच स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. अशा स्थितीत तो एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वरीष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. तसेच अनेकदा बेंचवर बसावं लागणाऱ्या खेळाडूंनाही या मालिकेत संधी मिळेल.
रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला कोण येणार?
भारतीय संघ व्यवस्थापन इशान किशनला भारताचा पहिला पसंतीचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून निवड करेल असेच वाटत आहे. शिखर धवन वरच्या फळीत रोहित सोबत सलामीला परतल्याने इशान किशन इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळू शकला नव्हता. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीत ईशान सलामीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. किशनने कर्णधार धवनसह डावाची सुरुवात केल्यास भारताकडे आघाडीच्या फळीत दोन डावखुरे फलंदाज असतील. भारतीय संघ व्यवस्थापनाला डावे-उजवे संयोजन हवे असेल, तर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकाला सलामीला संधी दिली जाऊ शकते.
गायकवाडने एकदिवसीय सामने खेळले नाहीत
ऋतुराज गायकवाडने अद्याप एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. पण, देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. यादरम्यान ६३ डावांमध्ये त्याने १०० च्या स्ट्राईक रेटने आणि ५५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. २०२१ मध्ये ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत वन-डे स्पर्धेत महाराष्ट्रासाठी ४ शतकांच्या मदतीने ६०३ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ११३ असा राहिला होता. तर दुसरीकडे शुभमन गिलचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. गिल आतापर्यंत ३ सामने वनडे खेळलेले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये तो ऑस्ट्रेलियात शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळे १८ महिन्यांनंतर तो एकदिवसीय संघात परतला आहे. गिलने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर म्हणून १३२.३२ च्या स्ट्राइक रेटने ४८३ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत धवनसोबत सलामी साठी निवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनाला खूप मेहनत करावी लागू शकते.
मधल्या फळीत कुणाला संधी मिळणार?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत मधली फळी कशी असेल? कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते? या प्रश्नाचे उत्तर धवन आणि प्रशिक्षक द्रविडलाही शोधावे लागणार आहेत. सूर्यकुमार यादव हा निश्चितच मधल्या फळीत दिसणार आहे. मात्र उर्वरित दोन-तीन जागांसाठी श्रेयस अय्यर, दीपक हुडा, संजू सॅमसन आणि शक्यतो शुबमन गिल यांच्या नावांत लढत पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : “हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील”; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
- Shinde Vs Thackeray : “…व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का?”, शिंदे गटाची कोर्टात विचारणा
- Sanjay Raut -“हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील” ; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
- Sanjay Jadhav | “लोभाला मर्यादा असावी” ; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा
- AIMIM : गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; एमआयएम तक्रार दाखल करण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

