Share

“…प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील”, पंजाबमधील ‘त्या’ घटनेवर संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने पंजाब भाजप प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहाली पोलिसांनी तेजिंदर यांच्या विरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला असून भाजपच्या नेत्यांनी राज्यातील भगवत मान सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. पोलिसांचा व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कोण करत आहे हे देशाची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची अडवणूक केली व त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून पळवून लावले. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात. या प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील. तोपर्यंत देश अखंड राहील काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

बग्गा यांनी केजरीवाल यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा भाषेचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांना भडकवले. केजरीवाल यांना जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य या महाशयांनी केले. त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची अडवणूक केली व त्याची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून पळवून लावले. दिल्ली व हरियाणा पोलिसांचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे न्यायालयानेच म्हटले आहे. याचा अर्थ असा की, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!