Share

IPL 2022 CSK vs DC : गायकवाड-कॉनवेची सुरुवात आणि धोनीचा फिनिशिंग अंदाज..! चेन्नईचा दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात रंगत आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी सलामी दिली. कॉनवेने ८७ धावांची खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात चेन्नईचा माजी कप्तान रवींद्र जडेजा संघाबाहेर असून शिवम दुबेला संधी मिळाली. दिल्लीनेही केएस भरत आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिले आहे.

चेन्नईचा डाव

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी पुन्हा एकदा चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ५७ धावा केल्या. नवव्या षटकात कॉनवेने २७ चेंडूत आपले सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. १०व्या षटकात या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. पुढच्या षटकात वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने ऋतुराजला बाद करत ही भागीदारी मोडली. ऋतुराजने ४ चौकार आणि एका षटकारांसह ४१ धावा केल्या. तर पहिल्या गड्यासाठी त्याने कॉनवेसोबत ११० धावा उभारल्या. कॉनवेने शिवम दुबेला सोबत घेत धावगती संथ होऊ दिली नाही. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. १७व्या षटकात खलील अहमदने कॉनवेला तर पुढच्या षटकात मिचेल मार्शने दुबेला बाद केले. कॉनवेने ७ चौकार आणि ५ षटकारांसह ८७ धावांची सुंदर खेळी केली, तर दुबेने १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा ठोकल्या. महेंद्रसिंह धोनीने ८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २१ धावा करत चेन्नईला दोनशेपार पोहोचवले. २० षटकात चेन्नईने ६ बादल २०८ धावा उभारल्या. दिल्लीकडून नॉर्कियाने ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश थिक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!