Share

IPL 2022 Auction: शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींत केले खरेदी

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायरला ८.५ कोटींत विकत घेतले आहे.(Shimron Heitmeyer was bought by Rajasthan Royals for Rs 8.5 crore) हेटमायरने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी १६८.०५ च्या स्ट्राइक रेटने २४२ धावा केल्या होत्या. त्याला लिलावात खरेदी करण्यात राजस्थान रॉयल्स आणि कॅपिटल्स हे दोन संघ सर्वाधिक इच्छुक होते.

दरम्यान शिमरॉन हेटमायरसह राजस्थान रॉयल्सने भारतीय खेळाडू देवदत्त पडिक्कलला ७. ७५ कोटींमध्ये विकत घेतले आहे. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला होता. देवदत्त पडिक्कल हा आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. त्याने १४ सामन्यांत ४११ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक याचा समावेश आहे. त्याने २९ आयपीएल सामन्यांमध्ये ३१.५७ च्या सरासरीने८८४ धावा केल्या आहेत.

दरम्यान राजस्थान रॉयल्सने फक्त तीन क्रिकेटपटूंना रिटेन केले. शिमरॉन व्यतिरिक्त, रॉयल्सने ट्रेंट बोल्टला ८ कोटीत तसेच देवदत्त पडिक्कलला ७. ७५ कोटींमध्ये विकत आणि अनुभवी भारतीय फिरकीपटू आर अश्विनलाही ५ कोटीमध्ये विकत घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!