Share

‘एवढंच राहिलं होतं, देवालाही त्यांनी…’; जितेंद्र आव्हाडांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक (UP Elections 2022) २०२२ च्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. १० आणि १४ फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हे मतदान होणार आहे. पण, राज्यातील या भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये पत्रकाराने योगी आदित्यनाथ यांना ‘तुम्ही फक्त राजपुतांचं राजकारण करता असं म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला दु:ख होतं का?’ असा प्रश्न केला आहे.

यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, मला अजिबात दु:ख होत नाही. क्षत्रिय जातीत जन्म घेणं काही गुन्हा नाही. या देशातील एक अशी जात आहे ज्यात खुद्द देवानं देखील जन्म घेतला आहे. आणि वारंवार जन्म घेतला आहे. त्यामुळे आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या याच उत्तरावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. व्हिडिओ शेअर करत, एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला, असं ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!