🕒 1 min read
नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा अशी इच्छा भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात बागपत येथे बोलताना ते म्हणाले, ‘पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटी आहे तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींवर पोहोचली आहे. हा चिंतेचा विषय आहे. मुस्लिमांना देण्यात येणारा अल्पसंख्यांक दर्जा तात्काळ संपुष्टात यावा असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मुस्लिमांनी आता स्वत:ला हिंदूंचं धाकटं भावंड समजून चालावं आणि देशात त्यांच्यासोबत रहावं’ असं वादग्रस्त वक्तव्य केलंय.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
