Share

हिंदुत्व विरोधी नितीश चालले मग महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना का नाही? तिवारींचे भागवतांना खुले पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बिहार विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीनंतर उत्पन्न राजकीय परिस्थितीत भाजपाने ज्या प्रकारे प्रखर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, पण हाच मापदंड शिवसेनेसाठी महाराष्ट्रात कां अंगी कारण्यात आला नाही ? असा प्रश्न संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना विचारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि रा.स्व.संघाचे एकेकाळचे पूर्णकालिन स्वयंसेवक तथा शेतकरी व शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी एक मार्मिक खुले पत्र डॉ.भागवत यांना लिहिले असून शिवसेनेला सातत्याने दूर सारण्यासाठी टार्गेट करणाऱ्या चांडाळ चौकडीच्या कारस्थानचे पितळ उघडे केले आहे.

आपल्या पत्रात तिवारी यांनी म्हटले आहे की, “संपुर्ण देशाला माहिती आहे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा सातत्याने पुरस्कार केलेला असून आजही शिवसेना हिंदुत्वासाठी कोणतेही त्याग करण्यास सदैव तयार असताना,महाराष्ट्र भाजपातील देवेंद्र रुपी चांडाळ चौकडी सातत्याने शिवसेने विरुद्ध आग ओकीत आहेत. यामागे फक्त आणि फक्त सत्तेचे राजकारण असून मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिवसेनेला कदापि देणार नाही, ही कलुषित भावना ठेवून, ३० वर्षाची सच्ची सहकारी- साथी असलेल्या शिवसेनेला बाजूला सारण्याचे कृष्णकृत्य या मंडळीने चालू ठेवले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विरूध्द सातत्याने गरळ ओकण्याचे काम राणे, सोम्मया आदी शिवसेना विरोधी मंडळीस देण्यात आले असून यात फक्त पदाची लालसा असलेली मंडळी या लोका कडून भाट गिरीचे काम करवून घेत असताना हिंदुत्वा चा मुद्दा मात्र बाजूला लोटून हे सर्व कुटील कारस्थानं सुरू असल्याचे तिवारी यांनी विशद केले आहे.

गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण फक्त सत्तेसाठी सुरू असून शिवसेना-भाजपा जर एकत्र आले तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे लागेल, या भीतीपोटी ही मंडळी शिवसेनेला बाजूला सारण्यासाठी सतत बदनाम करून हिंदुत्वाच्या मुद्द्याचा सुद्धा बळी देत आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना हिंदुत्व विरोधी असले तरी मुख्यमंत्री केले पण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सदैव पाठराखण करणारी सच्ची साथी असलेली हिंदुत्ववादी शिवसेना मात्र कशी दूर सारली गेली, याचा सविस्तर उहापोह या पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची फक्त आणि फक्त आपणास मिळावी, या कलुषित भावनेने हिंदुत्ववादी शिवसेनेला बाजूला लोटून त्यावर रात्रं-दिवस काम करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रिय भाजपाला गुमराह करून सातत्याने दबाव निर्माण करण्याचे काम, या देवेंद्रच्या चांडाळ चौकडी इकडून सुरू असून , त्यामुळे राष्ट्रवादी हिंदुत्ववादाला तिलांजली दिली जावून राष्ट्राचे अतोनात नुकसान होत आहे, ही बाब संघ नाकारून शकत नाही. बिहार साठी एक माप दंड आणि महाराष्ट्रसाठी दुसरा, हे भाजपा चे कसे काय धोरण ?

याप्रकरणी रा.स्व. संघाने हस्तक्षेप करून हिंदुत्वाचा उपहास होऊ नये, यासाठी या चांडाळ चौकडीला वेळीच काबूत आणावे आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी राष्ट्रिय भाजपला योग्य सल्ला द्यावा, त्यामुळे राष्ट्रवादी हिंदुत्वाचा उपवास होणार नाही आणि शिवसेना या उदात्त हेतू पासून भाजपा कडून दूर जाणार नाही,” याची काळजी घेण्याची कळकळीची विनंती सुद्धा किशोर तिवारी यांनी रा स्व संघ प्रमुखांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!