Share

मध्यप्रदेशमधील राजकीय घडामोडींनंतर राहुल गांधी याचं भावनिक ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता होणारा हा प्रवेश दुपारी २.५५ वाजता झाला.दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदेंनीकाँग्रेस नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसमध्ये नवं नेतृत्वा मान्य होत नसल्याचं ते म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले.

या वेळी बोलतांना ज्योतिरादित्य सिंधिया म्हटले की ‘काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, म्हणून मी कॉंग्रेस सोडतोय ,असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर शिंदेंनी टीका केलीय.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. माझ्या आयुष्यात २तारखांना अतिशय महत्त्व आहे, ३० सप्टेंबर २००१ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख १० मार्च २०२० जी वडिलांची ७५ वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधींनी केलं भावनिक ट्वीट –

दरम्यान काल पासून घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर कुठलीही प्रतिक्रिया न दिलेले राहुल गांधी यांनी आज ट्वीटर वर आपली दीड वर्ष पूर्वीची पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांच्या सोबत सिंधिया आणि कमल नाथ दोघही आहे

या फोटोला कॅप्शन लिओ टोलस्टोय याचं वाक्य आहे. ज्यात लिहलय ‘दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत संयम आणि वेळ’. त्यामुळे राहुल यांना त्यांच्या यंग ब्रिगेडमधील नेता पक्ष सोडून गेल्याचं दुख झालं असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान पेट्रोलच्या किमतीत कपात करावी अशीही मागणी राहुल गांधीनी केली आहे. ते म्हणाले ,’अहो नरेंद्र मोदी, आपण जनतेने निवडलेल्या कॉंग्रेस सरकारला अस्थिर करण्यात व्यस्त असतांना जागतिक तेलाच्या किंमतींच्या ३५ % कोसळले आहेत याची  नोंद करणे आपणास चुकले असाल. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर ६० रुपया पर्यंत कमी करुन तुम्ही भारतीयांना फायदा देऊ शकाल का ? रखडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यास त्याची मदत होईल.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!