🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौंसर शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग काहीकाळ अडवून धरला होता.
काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.
काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात सत्तास्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रणित सरकारला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी टीका करत प्रश्न विचारले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे.
काँग्रेसच्या राज्यात शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, याची दखल महाराष्ट्रातलं शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार घेईल का? छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारं शिवसेना सरकार शिवरायांचा असा अपमान सहन करू शकेल का? असे सवाल भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा पेटणार अशी चिन्हं आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र का गौरव हैं,हमारे आराध्य हैं व देश की प्रेरणा के स्रोत हैं।
उनका अपमान किसी भी कीमत पर सहन नहीं किया जायेगा।अगर आपत्ति थी तो उनकी प्रतिमा को सम्मानजनक तरीके से भी हटाया जा सकता था लेकिन यह सरकार तो महापुरुषों का अपमान करने में गर्व का अनुभव करती है। pic.twitter.com/7shlvhjLdq
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
मुख्यमंत्री कमलनाथ जी क्षमा याचना करें और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को ससम्मान स्थापित करने की तत्काल व्यवस्था करें।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
महाराष्ट्र की शिवसेना सरकार जिसमें कांग्रेस भी शामिल है, छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श मानती है। उनका ऐसा अपमान क्या वे सह पाएंगे?
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
नक्की काय घडलं –
मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून तरुणांकडून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता.
चौकात एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली.
दिवसा कारवाई केली तर लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. हे लक्षात येताच लोक रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातही याविषयी चर्चा सुरू आहे. ‘शिवरायांना आदर्श मानणारं ठाकरे सरकार काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तेत आहे. त्यांना शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन कसा होतो’, असा तिखट सवाल शिवराज सिंह यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी आणि कमलनाथ यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी अशीही मागणी शिवराज सिंह यांनी केली आहे.
मराठा महासंघाची प्रतिक्रिया –
या प्रकरणाबाबत महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याबाबत विनंती करणारं पत्र लिहणार असल्याची माहिती दिली.
तसेच ट्राफीकचा मुद्दा असला तरी वाहतूक वळवून हा प्रश्न सोडवता आला असता असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात आपण सी पी आणि जाॅइंट सी पी यांना उद्या फोन करणार आहे असेही त्यांनी सांगितले.
‘सरकार कोणाचेही असो, ते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं नाही’ : राजेंद्र कोंढरे यांची प्रतिक्रिया –
आम्ही या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करतो. सरकार कोणाचेही असो, कोणीही व्यक्ती असो, ते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं नाही. जे सी बी लाऊन पुतळा हटवण्याचा जो प्रकार घडला याबद्दल देशभरातील शिवप्रेमी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही . तसेच हटवलेला पुतळा पुन्हा त्या जागी बसवावा अशी आमची मागणी आहे. देशभरातील शिवप्रेमी सरकारवर प्रहार करतील. अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांनी महाराष्ट्र देशाला दिली आहे.
घटनेचा निषेधच, परंतु आधी परवाणग्या घ्याव्यात, जेणेकरून महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणार नाही – संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांची प्रतिक्रिया –
छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महापुरुषांचे पुतळे सरकारने काढू नये. तसेच पुतळा स्थापन करण्यापूर्वी संयोजकांनी संबंधित सर्व परवाणग्या घ्याव्या. जेणे करून महापुरुषांच्या पुतळ्यांचा अपमान आणि विटंबना होणार नाही , याची काळजी पुतळा बसवताना घेणं गरजेचं आहे.
तसेच सरकारने महापुरुषांचे पुतळे हटवण्याची घटना निंदनीय आणि नालायकपणाची आहे असा घानाघातही टिळक भोस यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना केला आहे.
प्रशासन नरमले ; छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवण्याचा ठराव सौंसर नगरपालिकेत संमत –
छत्रपतींचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ चक्का जाम आंदोलन आणि शिवराय युवा संघटन यांच्या आक्रमक विरोधापुढे अखेर नगरपालिका प्रशासन नरमले आहे. बैठकांच्या फेऱ्यांनंतर तोडगा काढण्यात आला.
सदर प्रकरणात आता प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून नगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा स्थापित करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती सौंसर नगरपालिकेचे नगराध्यक्ष लक्ष्मण चाके यांनी माध्यमांना दिली आहे.
तसेच आमदार विजय चौरे यांनी याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाला छत्रपतींचा पुतळा पुन्हा स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
