Share

संभाजी भिडें विरोधात आरोपपत्र दाखल करा, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दंगली प्रकरणी भिडे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या पोलिसांना कोर्टाने फटकारले आहे. यावेळी भिडे यांच्या विरोधात ११ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश यावेळी हायकोर्टाने दिले आहेत.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव संग्रामाला २०० वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यभरातून लाखो भीम अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमले होते. यावेळी दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. यावेळी पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, दंगल भडकावल्या प्रकरणी संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आरोपी संभाजी भिडे आणि इतर आरोपींविरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण करुन, 11 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!