Share

ऊस गळपाचे पैसे मिळावेत म्हणून बॉयलरवर शोले स्टाईल आंदोलन

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील शिला अतुल साखर कारखान्याने सहा महिन्यापासून ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने नकुलेश्वर बोरगाव (ता. औसा) येथील शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन केले. त्यानंतर कारखान्यातील काम बंद करून प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना शांततेचा सल्ला दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील नितळी येथील शिला-अतुल साखर कारखाना भाडेतत्वावर एका खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी दिला आहे. २०१८-१८ च्या गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांना कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला. जानेवारी २०१९ मध्ये पदरमोड करून ऊसाचे गाळप केले. मात्र तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांना एक दमडीही दिलेली नाही. नकुलेश्वर बोरगाव (जि. लातूर) येथील सुमारे १५ शेतकरी सकाळी ११ च्या सुमारास कारखाना स्थळावर आले. त्यांनी प्रथम प्रशासनासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अखेर आंदोलन सुरू केले. सहा ते सात शेतकरी कारखान्याच्या चिमणीवर जावून सुमारे १५० फूट उंचीवर जावून बसले. पैसे दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान कारखाना प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. धावपळ करीत प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान त्यापूर्वीच उर्वरीत शेतकऱ्यांना कारखान्यातील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सुचना केल्या. तेव्हा कारखान्यातील कर्मचारीही कारखान्याच्या बाहेर जाऊ लागले. इतक्यात काही पोलिस कर्मचारीही तेथे आले. त्यानंतर हळूहळू चिमणीवर चढलेले शेतकरी खाली उतरले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासन तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत. पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाहीत’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सहा महिने झाले एक रुपयाही कारखान्याने दिलेला नाही. माझी आई आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. आम्ही कोणाकडे भिक मागवी. प्रशासनही याची दखल घेत नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!