🕒 1 min read
Gunratn Sadavarte | पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) देखील सहभागी झाले आहेत. पण हा बंद बेकायदेशीर असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी.”
दरम्यान, पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील व्यापारी संघटना फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (FATP) चे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी बंदला पाठिंबा दिला असून दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी देखील या बंदला पाठींबा दिला आहे.
राज्यपालांचं वक्तव्य काय?
राज्यपाल गेल्या महिन्यात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते. “जर कोणी विचारले की तुमचा आयकॉन कोण आहे, तर तुम्हाला कोणाच्या शोधात बाहेर पडण्याची गरज नाही. ते तुम्हाला इथे महाराष्ट्रात सापडतील. छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले आहेत. तुम्ही नवीन लोकांना रोल मॉडेल म्हणून पाहू शकता. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत,” असे विधान राज्यपालांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sachin Sawant | “अनिल देशमुख भाजपाच्या विखारी राजकारणाचे बळी आहेत”; सचिन सावंतांची खोचक टीका
- Rohit Pawar | रोहित पवारांचा गनिमी कावा, बेळगावात दाखल! शिवरायांच्या पुतळ्याला केले अभिवादन
- KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ दिवशी बांधणार लग्नाची रेशीमगाठ
- Periods | मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव का होतो? जाणून घ्या

