Share

Eknath Shinde | स्वतः एकनाथ शिंदेच म्हणाले, “राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी पण स्टेरिंग मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याच हातात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता स्वतः एकनाथ शिंदे यांनीच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय.

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घटानासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी दोघांनीही उपस्थित जनतेला संबोधित केलं. आपल्या भाषणाला पुढे सुरुवात करताना आणि उपस्थितांचे आभार मानताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय देवेंद्र फडणवीसजी’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार असला तरीही देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचं नियंत्रण होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना कोकणवासींना शब्द दिला आहे. “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही”, असं फडणवीस म्हणालेत. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!