Share

Vasant More | “तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय”, मनसे नेते वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर

Published On: 

🕒 1 min read

Vasant More | पुणे : मनेसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खूली ऑफर दिली आहे. तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मी कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे.

वसंत मोरे म्हणाले, “अजित पवारांनी पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांनी भेटायला देखील बोलावले. लग्नसमारंभातील तो व्हिडीओ होता. दादा गर्दितून माझ्याकडे आले आणि मी पण दादांकडे गेलो. दादा म्हणाले, अरे अजून किती दिवस नाराज, या आम्ही वाट बघतोय. जाताना देखील म्हणाले वसंतराव मला भेटायचे आहे. मात्र मला माझे साहेब प्रिय आहेत. पण बाकीच्यांचा त्रास मला जाणवतोय. स्टेजवर बसवाचं, मी काही शोचा भाग नाही.”

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक आणि प्रमुख चेहरा वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसे सोडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. या अंतर्गत आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर भोंगा लावण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र वसंत मोरे यांनी आपल्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता. माझ्या मतदारसंघातील मुस्लिम मतदार नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसाची प्रतिष्ठापना कशी करणार, असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला होता. वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसे नेते नाराज झाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!