🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : पत्रकार परिषदेत बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक (Nashik) येथील खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना टोला लगावलत आव्हान दिलं होतं. त्यालाच आता हेमंत गोडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनीच शिवसेनेच वाट्टोळ केलं असल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी संपूर्ण शिवसेनेचं वाटोळं केलं. या माणसामुळे शिवसेनेची वाट लागली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचं काम राऊत करत आहेत. संजय राऊत यांच्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलीन झाली असा गंभीर आरोप गोडसे यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा होता, चेहरा नाही तर काम महत्वाचं असत, असं प्रत्युत्तर हेमंत गोडसे यांनी दिलं आहे. तसेच, संजय राऊत यांनी राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली, या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळं केलं असल्याचा आरोप देखील गोडसेंनी केला आहे.
दरम्यान, एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात राऊत करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचे देखील गोडसे म्हणाले.
दरम्यान, हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का ? शिवसेना हे नाव चेहरा आहे, शिवसेना नावाची चार अक्षरं चेहरा आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे. असं म्हणत असतांना संजय राऊत यांनी ते प्यारे झाले आहे , अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | “उदयनराजेंनी आंदोलन करू नये”, राज्यापालांविरुद्ध गेलेल्या उदयनराजे भोसलेंना गुलाबराव पाटलांची मागणी
- Sushma Andhare | “आमच्याकडे एक सुशी ताई आहेत…”, सुषमा अंधारेंवर राजू पाटीलांचं टीकास्त्र
- Abdul Sattar | “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी…”, अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार
- Deepak Kesarkar | “शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण…”, दीपक केसरकरांचं विधान
- Udayanraje Bhosale | अखेर राज्यपालांच्या विधानाची चौकशी होणार? उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींनी घेतली दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
