🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. यालाच आता मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारे यांनी मुलुंडमधील प्रबोधन यात्रेच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
यादरम्यान, मराठीत वरचा मजला रिकामा असा वाक्प्रचार आहे, पण आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या वरच्या मजल्यावर घनदाट अंधार आहे, अशी टीका राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंवर केली आहे.
तसेच, आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात, असं देखील पाटील म्हणाले.
'वरचा मजला रिकामा' असा मराठीत वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही.आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात. #MNS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) December 3, 2022
आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी…”, अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार
- Deepak Kesarkar | “शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण…”, दीपक केसरकरांचं विधान
- Udayanraje Bhosale | अखेर राज्यपालांच्या विधानाची चौकशी होणार? उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींनी घेतली दखल
- Hemant Godse | संजय राऊतांची टीका हेमंत गोडसेंच्या जिव्हारी लागली, म्हणाले…
- Chitra Wagh | “उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची हौस फिटली”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
