🕒 1 min read
ShivendraSingh Raje Bhosale | सातारा : प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाला मला कोणाचाही निरोप आला नसल्याने मी प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण खासदार उदयनराजे भोसले यांनी काल आयोजित केलेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले होते. मात्र आता याच भूमिकेवर त्यांचे धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली आहे. आपण ज्या घराण्याचे वारस आहोत त्याच घराण्यातील कार्यक्रमाला आपल्याला कोणी बोलवण्याची गरज काय आपण घराण्यातील वारस म्हणून या कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते, असा सल्ला देत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंवर टीका केली आहे.
मला आमंत्रण नव्हते. फोन देखील आला नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी शिवप्रताप दिनाची तारीख एकच केली पाहिजे. हा वाद मिटवायला हवा. इतकी वर्षे 10 नोव्हेंबर हा दिवस होता. आजचा कार्यक्रम राजकारण होते की नाही यावर बोलणार नाही, असं स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते.
…आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत –
परवाच्या दिवशी मला गहिवरुन आलं ते कशामुळे आलं? मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला होता.
तसेच, लोकांनी विचार करायला पाहिजे ना. लाज वाटली पाहिजे, एवढं सगळं होत असताना स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही लोकशाहीच्या चार स्तंभातील महत्त्वाचे घटक आहात. तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत, असं देखील ते म्हणाले होते.
दरम्यान, राज्यपाल राज्याचा प्रमुख असतो. त्यांनीपण असे विधान करायचे? उद्या आणखी कोणी मोठ्या पदावरचा करेल. तुम्ही खपवून घेणार आहात का?, असा खोचक सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दोन डोळे माझे आहेत तसे प्रत्येकाचे आहेत. पण संपूर्ण समाज आपल्याकडे बघत असतो. क्षणभर सत्तेत राहण्यासाठी सत्तांतर, मी याला फारसा महत्त्व देत नाही. तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही?, असा देखील सवाल त्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले”, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
- Nana Patole | “मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”; नाना पटोलेंची आक्रमक भूमिका
- Sanjay Gaikwad | एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी, संजय गायकवाड यांचं वक्तव्य वादात
- Ravi Rana | “काँग्रेसच्या वतीने उद्धव ठाकरे माफी मागणार का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन रवी राणा यांचा सवाल
- Navneet Rana | “…तर मला अभिमान वाटेल!”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाला नवनीत राणांची सहमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
