Share

Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या विनयभंगा प्रकरणी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. यावर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत विधान केलं आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाच्या मुद्दावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले.

कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केलं त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. इथे सगळ्या गोष्टी नियमांच्या आदीन राहून केल्या जात आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रिदा रशिदा असं महिलेचं नाव असून त्यांच्यासह आणखीन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. छटपूजेच्या दिवशी मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रंही होते. त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन तीन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!