🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कीर्तीकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यादरम्यान, गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असं सांगत संजय राऊत यांनी कीर्तिकर यांना दिलेल्या पदांची यादीच बाहेर काढली.
तसेच, अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत, उम्र की पडाव की बात है, आणखी काही नाही, अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते. फार फार मोठी सळसळ झाली असं काही नाही. गेले ठिक आहे. उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील, असं राऊत म्हणाले. आपण गेलात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. कीर्तिकर गेल्याने पक्षाला काहीच धक्का बसलेला नाही, पुन्हा निवडून यायचं आहे ना त्यांना, किती येतात ते पाहू, असं आव्हानही त्यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या :
- Job Alert | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘या’ पदांच्या 787 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Gajanan Kirtikar | “…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला”, गजानन कीर्तीकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- NCP | “केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही, तशा महिलेवर…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक विधान
- Congress | “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, म्हणून…”, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं विधान
- Shivsena | शिवसेनेत पिता-पुत्रात फुट! गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश तर चिरंजीव ठाकरे गटातच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
