🕒 1 min read
NCP | मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हड यांना अटक करण्यात आली. या अटक प्रकरणात केतकी चितळे हिने उडी घेतली आहे. अशातच शरद युवा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून आज डोंबिवलीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Saikh) यांनी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही तशा महिलेवर मी बोलणं यात काही पॉईंट नसल्याची प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली आहे. चितळे यांच्या वकिलांनी पोलिसांना पत्र देत आव्हड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. तसेच सध्या राज्यात हर हर महादेव वरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटावर टीका केली होती. “हर हर महादेव, या सिनेमात विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, म्हणून…”, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं विधान
- Shivsena | शिवसेनेत पिता-पुत्रात फुट! गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश तर चिरंजीव ठाकरे गटातच
- Sanjay Raut | राऊतांच्या जामीना विरोधातील अर्जावर २५ नोव्हेंबरला होणार सुनावणी, उत्तरासाठी दिला अवधी
- Gulabrao Patil | “खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी…”, गुलाबराव पाटलांचा पलटवार
- Girish Mahajan | “एकनाथ खडसेंचे कारनामे आता लवकरच बाहेर येतील”, गिरीश महाजन यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

