🕒 1 min read
Gajanan Kirtikar | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात आता शिवसेना नेमकी कोणाची?, यावरुन कीर्तीकर पिता पत्रामध्ये फुट पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत. या आपुलकीने मी या संघटनेत प्रवेश केला, असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटातच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी हेच विधान एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आज तसंच काहीसं दृश्य बघायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला तर काहींनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. पण शिवसेनेच्या या दोन गटांची लढाई आता घरा-घरापर्यंत पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही, तशा महिलेवर…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक विधान
- Congress | “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, म्हणून…”, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं विधान
- Shivsena | शिवसेनेत पिता-पुत्रात फुट! गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश तर चिरंजीव ठाकरे गटातच
- Sanjay Raut | राऊतांच्या जामीना विरोधातील अर्जावर २५ नोव्हेंबरला होणार सुनावणी, उत्तरासाठी दिला अवधी
- Gulabrao Patil | “खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी…”, गुलाबराव पाटलांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

