Share

Ajit Pawar | “मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही…” ; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांना अजित पवार यांनी आपल्या शैलीत पूर्णविराम दिला आहे. मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे अशा शब्दात त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर अजित पवार त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही, असा लागणारा सूर त्यांना अजिबात पटलेला नाही. या घडामोडींवर बोलण्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेतली जाईल, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

पुढे अजित पवार म्हणाले की, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत मी बाहेरगावी होतो. कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता बातम्या चालवण्या ऐवजी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधला असता तर त्याची माहिती मिळाली असती, अशा शब्दात अजित पवार यांनी माध्यमांची कानउघडणी केली. या काळात माझी बदनामी करून जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!