Share

Hera Pheri 3 | ‘हेरा फेरी 3’ मध्ये दिसणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हेरा फेरी (Hera Pheri) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजही हा चित्रपट अनेकजण बघतात. हेरा फेरी या चित्रपटाचा प्रथम भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागले. तर या फ्रेंचाईजीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा सध्याचा सुपरस्टार कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे. ही माहिती अभिनेता परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर दिली आहे. एका चाहत्याने त्यांना विचारले होते की, सर कार्तिक आर्यन हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे का? परेश रावल यांनी त्याला रिप्लाय देत उत्तर दिले की, “होय, हे खरं आहे.” त्यांच्या या रिप्लायने कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने गेल्या महिन्याभरात निर्मात्यांसोबत अनेक मीटिंग केल्या आहेत. पण कार्तिक आर्यन या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार सोबत स्क्रीन शेअर करणार आहे की त्याची जागा घेणार आहे याबद्दल अद्याप कोणतीही निश्चित माहिती मिळालेली नाही. तर दुसरीकडे या बातमीने अक्षय कुमारचे चाहते रागवले असून हेराफेरी 3 अक्षय कुमार शिवाय व्यर्थ आहे असे ते म्हणत आहे.

कार्तिक आर्यन सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीचा स्टार आहे. कार्तिकने भुलभुलय्या 2 या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. तर आता कार्तिक फ्रेडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!