Share

Car Tips | बजेटमध्ये कार शोधत असला, तर ‘या’ गाड्या आहेत सर्वोत्तम पर्याय

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या ऑटोमोबाईल सेक्टर (Automobile Sector) मध्ये झपाट्याने वाढवत आहे. परिणामी अनेक कार (Car) उत्पादक कंपन्या आपल्या कार दिवसेंदिवस अपडेट करून आपल्या ग्राहकांसाठी त्याचे सर्वोत्तम व्हेरियंट सादर करत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार निवडणे खूप कठीण झाले आहे. विशेषता आपण कार खरेदी करताना बजेट आणि मायलेज या दोन्ही गोष्टी बाबत चांगला पर्याय शोधत असतो. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगल्या कार बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या तुम्हाला उत्तम मायलेजसह बजेटमध्ये उपलब्ध असतील.

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) या रेनॉल्ट कारची भारतामध्ये सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे. या कारमध्ये 799cc 3 सिलेंडर BS6 इंजिन आहे, जे 54PS पॉवर आणि 72Nm टार्क मॅक्झिमम जनरेट करते. ही कार बाजारामध्ये ओव्हरस्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर, ABS+EBD, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर डोअर चाइल्ड लॉक, रिअर पार्किंग इमर्जन्सी रिट्रॅक्टर सीट बेल्ट, ड्रायव्हर एअरबॅग इत्यादी फीचर्स सोबत उपलब्ध आहे.

ह्युंडाई सेंट्रो (Hyundai Santro)

देशातील आघाडीची वाहक उत्पादन कंपनी ह्युंडाई आपली ह्युंडाई सेंट्रो ही कार 5-सीटर हॅचबॅक कार 9 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये एक इंजिन पर्यायापासून दोन ट्रान्समिशन (मॅन्युअल आणि ATM) पर्यंत उपलब्ध आहे. ही कार बाजारामध्ये पाच रंगाच्या पर्यायाचा उपलब्ध आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार 20 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. तरीही कार बाजारामध्ये 4.68 ते 6.45 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

डॅटसन रेडी-जी (Datsun Redi-G)

डॅटसन रेडी-जी (Datsun Redi-G) या कारची भारतामध्ये एक्स-शोरूम किंमत 3.98 लाख ते 4.96 लाख पर्यंत आहे. ही कार बाजारामध्ये दोन इंजिन पर्यायासोबत उपलब्ध आहे. यामध्ये पहिले पेट्रोल इंजिन 0.8L चे आहे जे 53hp मॅक्झिमम पॉवर जनरेट करून 72Nm टार्क जनरेट करतो. तर दुसरे पेट्रोल इंजिन 53hp मॅक्झिमम पॉवर आणि 72Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही कार बाजारामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन या पर्यायासह उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso)

मारुतीची ही कार एक इंजिन पर्यायापासून दोन ट्रान्समिशन (मॅन्युअल आणि ATM) पर्यंत उपलब्ध आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार बाजारामध्ये 14 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 180mm ग्राउंड क्लिअरन्स 726 किलो कर्ब वजन आणि 240L बूटस्पेस आहे. या कारची किंमत 3.5 ते 5.55 लाख रुपये पर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!