🕒 1 min read
Sadabhau Khot | मुंबई : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं असून यामधून राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
यादरम्यान, सर्व प्रकल्प राज्याबाहेर गेले, टिकला तो फक्त लवासा, कारण त्याला भ्रष्टाचाराचा वारसा, असा घणाघात करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना डिवचलं आहे. यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. उद्या जर
महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं, मात्र, वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो शेवटी गुजरातला जातो, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे, असं मला वाटतं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा…”; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
- Raj Thackeray | “जो प्रकल्प बाहेर पडतो तो गुजरातला जातो, मला वाटत पंतप्रधान…” ; राज ठाकरे यांचे विधान
- Ananya Pandey | अनन्या पांडेचा ‘पू’ अवतार बघून करीना कपूर झाली इम्प्रेस
- Sharad Pawar | मोठी बातमी! शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- Bacchu kadu | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादाचा अद्यापही अंत नाही? राणांच्या दिलगिरी नंतर सुद्धा बच्चू कडू म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
