Share

NCP | “महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा…”; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

NCP | नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर  चांगलाच हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) प्रवक्ते रविकांत वरपे

महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित हेच शिंदे-फडणवीस सरकारचं धोरण आहे. शिंदे-फडणवीस एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील, असं म्हणत रविकांत वरपे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर आंदोलन करत आहेत.

घे ठेका, दे खोका असं शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्तातरानंतर स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत.

तसेच, देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, असं वरपेंनी म्हटलं.

पुढे बोलताना सगळे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने  तरुणांचं भविष्य अंधकारमय  केलं आहे. 50 खोके घेऊन तुमच्या 50 आमदारांचं पुनर्वसन करण्यासाठी नरेंद्र मोदींना तुम्ही हा महाराष्ट्र तुम्ही आंदण म्हणून दिलाय का?, असा सवाल रविकांत वरपे यांनी सरकारला केला आहे. एवढ्या सगळ्या आरोपांना शिंदे-फडणवीस सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं, महत्वाचंं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!