Share

Explained | उद्धव ठाकरेंशिवाय शिंदे गटातील मंत्र्यांचे राजकीय भविष्य धोक्यात? पुढे निवडून येणेही अवघड

Published On: 

🕒 1 min read

ओमकार गायकवाड : शिवसेनेचा काल ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. मात्र यावेळी शिवसेनेचे दोन मेळावे झाले. एक उद्धव ठाकरे गटाचा तर दुसरा एकनाथ शिंदे गटाचा. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. त्याचवेळी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात शिंदे गटाचा मेळावा झाला. दोन्ही गटाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका केली. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काल झालेल्या दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. कारण या दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी जोरदार तयारी केली होती. प्रचंड मॅन पॉवर आणि पैसे खर्च केले होते. अशा चर्चा आणि याबाबतच्या बातम्या माध्यमांतून समोर आल्या होत्या. शिंदे यांनी राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले होते. शिंदे गटाकडून तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले होते. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले होते. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली होती.

तसेच या मेळाव्याला उपस्थित जनतेसाठी जवळपास अडीच लाख फूड पॅकेट देखील वाटण्यात आले. कालचा शिंदेचा मेळावा पाहून या गोष्टी लक्षात येतात कि, एकनाथ शिंदे गटाने प्रचंड खर्च करून कालचा मेळावा केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ४० आमदार आणि १२ खासदार फोडत पक्षावर आपला ताबा मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदारांचा शिंदेंना पाठिंबा बघता त्यांचं पारडं जड होईल आणि ते उद्धव ठाकरे यांच्यावर भारी पडतील असं वाटत होत.

मात्र ही राजकीय गणितं काल चुकीची ठरली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा पाहता आमदार आणि खासदारांनी जरी शिंदेंची साथ सोडली असली तरी सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे दिसून आलं. ठाकरेंच्या मेळाव्याला देखील प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. आता यानंतर उद्धव ठाकरे हे अजूनही शिंदेंवर भारी पडत आहेत. तसेच कालच शिवाजी पार्कवरील राजकीय वातावरण पाहता आणि शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास पाहता हा शिंदे गटासाठी सतर्कतेचा इशारा मानला जातोय.

लोकांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा बघता शिंदे गटातील ४० आमदार सोडा, पण ९ मंत्री सुद्धा निवडून येतील की नाही, याबाबत आता कुठेतरी शंखा उपस्थिती केल्या जात आहेत. शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदिपान भुमरे, उदय सावंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे.

कारण मंत्री संदीपान भुमरे यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाचं पैठण शहरात आले होते. यावेळी त्यांचा स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांच्यावतीने सत्कार सुद्धा ठेवण्यात आला होता. मात्र यावेळी शिवसैनिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी भुमरे यांचे मोजकेच समर्थक पाहायला मिळाले. तर मोठ्याप्रमाणावर खुर्च्या खाली असल्याचे सुद्धा दिसून आले. त्यामुळे पैठण तालुक्यात याची चर्चा पाहायला मिळत असून, कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

तर दुसरीकडे, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे महंत आणि मंत्री संजय राठोड यांचे अतिशय निकटवर्तीय सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधले आहे. सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. राठोड शिवसेना सोडून शिंदे गटात गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुनील महाराजांना शिवबंधन बांधून मैदानात उतरवले आहे. यामुळे संजय राठोड यांचं भवितव्य यामुळे धोक्यात आलं आहे.

तर काल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असतानाच सभेला उपस्थिती असलेले लोकं मधूनच उठून जाऊ लागली. एकीकडे शिंदेच भाषण सुरु होत आणि दुसरीकडे लोकं सभेतून उठून जाऊ लागली होती. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता कालच मैदान उद्धव ठाकरे यांनी मारलं आहे, असं लक्षत येत आहे.

तसेच माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला लोकांचा मिळणार प्रतिसाद आणि त्यांच्या सभांना होणारी गर्दी हि शिंदे गट आणि भाजपच्या छातीत धडकी भरवणारी ठरतेय. प्रचंड जनसमुदाय आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय. तसेच याआधी ज्या ज्यावेळी बंद झाली त्यानंतर जे शिवसेनेतून बाहेर पडले ते पुन्हा निवडून आले नाहीत. हा इतिहास पाहता शिंदे गटातील आमदार आणि मंत्री यांचं पुढे काय होणार? हे येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Explained Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या