🕒 1 min read
कोरोना महामारी नंतर देशातील अनेक युवकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे. ही महामारी जशी जशी संपुष्टात येत आहे तसे तसे विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल 990 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९० जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय हवामान विभाग परीक्षा- २०२२’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या 990 जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी तब्बल 990 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. उमेदवाराने अधिक माहितीसाठी ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | “आता देवी सरस्वती सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”, नितेश राणेंचा छगन भुजबळांवर घणाघात
- Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील पालकमंत्री होताच अजित पवारांना धक्का, ‘इतक्या’ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल होण्याचे दिले संकेत
- New Rule | सरकारी कार्यालयात फोनवर ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार’, जाणून घ्या नियम
- Milind Narvekar | शिंदे गटात जाणार का?, मिलिंद नार्वेकर म्हणाले…
- Kishori Pednekar | मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
