Share

Nitesh Rane | “आता देवी सरस्वती सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”, नितेश राणेंचा छगन भुजबळांवर घणाघात

Published On: 

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर एका व्यक्तीने हिंदू धर्मा विरोधात वक्तव्य केल्याबाबत त्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. यावरुन भुजबळांनी व्यक्तीला धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यासह आणखीन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच धमकी देण्यावरुन भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भुजबळांवर जोरदार टीकेचा बाण सोडला आहे.

नितेश राणे यांचा घणाघात :

चेंबूर येथील व्यावसायिकाला देवी सरस्वीतीचा द्वेष करणाऱ्या राजकरण्याकडून धमकी देण्यात आल्यामुळे संबंधित राजकरण्यावर एफआयआर नोंदवला आहे. आता देवी सरस्वती सुद्धा त्यांना वाचवू शकत नाही, महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदुत्वाचं सरकार (State Gov.) आहे, हे लक्षात ठेवा, असं नितोश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणेंनी ट्विट करत घणाघात केला आहे.

पाहा ट्विट :

व्हिडीओ शेअर केल्याबाबत चेंबूर येथील व्यावसायिकाला मारण्याची धमकी भुजबळांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ :

दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!