🕒 1 min read
पुणे : पुणे शहराला पालकमंत्री नसल्याने विरोधकांनी अनेक वेळा टीका केली होती. माजी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी देखील अनेक वेळा याबाबत तक्रार केली होती. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री घोषित करण्यात आलं आहे. मात्र, पालकमंत्री होताच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना धक्का दिला असल्याचं म्हटलं जातं आहे.
चंद्रकांत पाटील यांचा अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना धक्का :
जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीसीच्या माध्यमातून ८३५ कोटी रुपयांच्या कामात फेरबदल करण्याचे संकेत पाटलांनी दिले आहेत. यावेळी डीपीसीच्या कामांच्या यादीमध्ये काही काम असेल तर कार्यकर्त्यांनी सुचवावे, तसेच ठरावीक कामासाठी निधी शिल्लक असल्यास अतिरिक्त निधी देऊ, शिल्लक निधीतून कार्यकर्त्यांनी सुचविलेली कामं करण्यात येतील, असं म्हणत अप्रत्यक्ष पद्धतीने चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांची कामाची यादी बदलणार असल्याचा इशारा दिला आहे.
सत्कार समारंभ नको :
पालकमंत्री पद मिळाल्यानंतर कोणीही जल्लोष साजरा करणं मान्य नसल्याचं चंद्रकांत म्हटलं आहे. यादरम्यान, सत्कार समारंभ नको, पुष्पगुच्छ देऊ नका, फटाके वाजविणार असाल, तर मी निघून जाईन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एवढंच नाही तर परिसरात कार्यकर्त्यांनी स्वच्छता ठेवावी आणि सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्या शक्य नाहीत, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. ते कमी करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविण्यावर भर देण्याचं ठरविलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
- Gulabrao Patil | “तुम्ही संपत्तीचे वारसदार आणि आम्ही …”; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Shahajibapu Patil | “शरद पवार हे एकट्या अजित पवारांच्या मालकीचे नाहीत”
- Heart Disease | हृदय विकार रूग्णांनी ‘ही’ आसने करणे टाळा, नाहीतर…
- Supriya Sule | “…हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
