🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, असं चित्र पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशातच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले विनायक राऊत ?
एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. त्यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती, असं विनायक राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत असताना 2014 सालचा राजकीय घटनापट मांडताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला.
एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होतं,असंही त्यांनी सांगितलं.
तसेच, भाजप पक्षाचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे त्यावेळी एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले?, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivaji Adahrao Patil । “… म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली”; आढळराव पाटीलांचा गौप्यस्फोट
- Gopichand Padalkar | “कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही”
- Jio Upcoming Mobile | Jio चा 5G फोन लवकर करणार आहे बाजारात एन्ट्री
- Maharashtra Rain Update | राज्यात पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस
- Gopichand Padalkar | सुप्रिया सुळेंनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
