Share

Uddhav Thackeray | धनुष्यबाण कुणाला मिळेल? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय? जाणून घ्या सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेना पक्ष हस्तगत करण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेला मोठा झटका देऊ शकतो. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह जर शिंदे गटाकडे गेले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका असेल. दरम्यान असे झाले तर उद्धव ठाकरे यांनी प्लॉन बी तयार केला आहे. झी २४ तासने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नव्या पक्षाचिन्हांसह लढण्याची तयारी सरु केली आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. याबाबत मातोश्रीवर खलबते पार पडली आहेत. उद्धव ठाकरेंचा प्लॉन बी काय असेल, याबाबत जाणून घेऊया.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास, नव्या चिन्हांसह लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यासाठी ठाकरेंनी टीम देखील तयार केली आहे. पहिली निवडणूक आहे, असं समजून लढायचं, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे लागले तयारीला-

शिवसेनेने पहिली निवडणूक चिन्ह नसताना लढवली होती. शिवसेनेने १९६७ साली प्रजा समादवादी पक्षासोबत युती केली होती. शिवसेनेचे तेव्हा ४२ नगरसेवक निवडूण आले होते. बहुमत असल्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे जाऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.

धनुष्यबाण कुणाचा?

निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले की, एक तर चिन्ह शिंदे गटाकडे जाईल किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल. दोन्ही गटाकडे चिन्ह गेले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येणार. कुरेशी एका मुलाखतीत म्हणाले, दोन्ही गटाचे दावे तपासले जातील. तसेच प्रत्येकाची सही तपासली जाईल. दोन्ही गट आपले दावे मांडतात, या सगळ्या प्रोसेसला ४ ते ५ महिने लागतात. या दरम्यान निवडणुका झाल्या तर निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवतात आणि दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नाव आणि चिन्ह देतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!