🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, याच ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या आरतीची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि रश्मी ठाकरे आमने सामने येणार का यावरुन तणाव वाढला आहे. अशातच शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंसह ठाकरे गटावर टीका केली आहे.
रश्मी ठाकरे यांच्यावर टीकास्त्रः
शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी व्हॅट्सअॅप चॅटचा एक स्क्रीनशाॅट देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये महिलांना महाआरती साठी आमंत्रण देण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं आवाहन देण्यात आलं आहे.
शीतल म्हात्रे यांचं ट्विटः
अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे… pic.twitter.com/gd6iB4XEKz
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 28, 2022
अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे…, असं कॅप्शन म्हात्रेंनी दिलं आहे.
दरम्यान, आज दुपारी ३ वाजता आरतीच्या कार्यक्रम होणार असून शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या नावाने वेळ आरक्षित केली आहे. त्यामुळे आता या दोन गटात सामना पाहायला मिळणार की रश्मी ठाकरे आपला दौरा रद्द करणार? याकडे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | “मी सध्या बेरोजगार आहे, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भर कार्यक्रमात हशा पिकला
- PM Yojana | ‘या’ योजनेअंतर्गत सप्टेंबर नंतरही गरिबांना मिळणार मोफत धान्य
- Supriya Sule | शरद पवारांनी केवळ ‘ही’ गोष्ट केली की ते पुन्हा सत्तेत येतात – सुप्रिया सुळे
- Uday Samant । विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करावा – उदय सामंत
- Lata Mangeshkar Award | उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
