Share

Atul Bhatkhalkar | “… करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात‌” छगन भुजबळ यांना अतुल भातखळकरांचं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आणखीन नेत्यांची या वादात उडी घेण्याची शक्यता असताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तरः

आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही सरस्वतीचा पदर धरून यावी असे प्रामाणिकपणाचे संस्कार मुलांवर करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात, असं उत्तर अतुल भातखळकर यांनी दिलं आहे. तसेच फक्त प्रामाणिकपणे लक्ष्मी कमावणाऱ्या माणसालाच त्या फोटोंची किंमत कळू शकते. बाकीच्यांनी त्या फंदात पडूही नये, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

पाहा ट्विट:

काय म्हणाले होते छगन भुजबळः

दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी देखील भुजबळांनी केली आहे.

दरम्यान, भुजबळांना उत्तर देत, सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपती चे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!