Share

Devendra Fadnavis | “मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिंदे गट आणि भाजप पक्षाच्या नेत्यांना समान वाटप करण्यात आले. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री केले आहे. त्यामुळे यामुद्यावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा जिल्हे कसं सांभाळणार असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधाला होतो.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

नाना पटोले यांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात, असं म्हणत फडणवीस यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले, नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात. ते ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर आम्हाला रिएक्शन का विचारता. ते बेताल बोलतात आणि बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याएवढा आमच्याकडे वेळ नाही.

तसेच नाना पटोले यांचं राज्य आलंच तर त्यांना तीन-चार जिल्ह्यांचे पालकमंत्री ठेवले, तर मी त्यांना ते कसे मॅनेज करायचे ते सांगेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पटोलेंचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं दिसून येतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!