🕒 1 min read
मुंबई : काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला वशंवादावरून सुनावलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला केला. अशातच ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला बानवकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
मा. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. यासंदर्भात बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे.
मा. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 21, 2022
भाजपमुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर मा. उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू,असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर मा. उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 21, 2022
उद्धव ठाकरे यांची टीका-
दरम्यान, वशंवादावरून माझ्यावर टीका होत आहे. माझ्या घराण्यावर टीका होतं आहे. मात्र, मला माझ्या वंशाचा आणि माझ्या घरण्याचा मला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघ होते. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहेत. भाजपने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंच शिवसैनिकांना आवाहन
- Uddhav Thackeray | महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
- Uddhav Thackeray : मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; ठाकरी तोफ धडाडली
- Raju Srivastav Death | जाता जाता सर्वांना हसवून गेले राजू श्रीवास्तव, कॉमेडियनचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य तर पुरुषांना कांस्य पदक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
