🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या दरम्यान ईडीने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव असल्याचं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. भातखळकरांच्या या वक्तव्याला राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव आहे, हे अतुल भातखळकरांना कसं कळालं?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतना त्या असंही म्हणाल्या ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.
मला अमिक शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल-
तुम्हाला जर जास्तीची काही माहिती असेल, तर याचा अर्थ ईडीकडून पेपर लिक होत आहेत. जर असं असेल तर मला दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ-
दरम्यान, सोमवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- महागाईचा तडाखा, दिवाळीपूर्वी महागणार महिंद्रा थार
- Ajit Pawar | “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण…”, रामदास कदमांवर अजित पवार संतापले
- Viral Monkey Video | माणसाची बॅग उघडून माकड चोरी करताना दिसले, व्हिडिओ पाहून हसू आवरेना
- Ayurvedic Treatment For PCOD | PCODची समस्या दूर करण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय वापरा
- Hero Electric Scooters Price | हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती सोबतच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
