🕒 1 min read
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. अशातच वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबत विचारलं असतं राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रीया मांडली.
वेदांता प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांची प्रतिक्रीयाः
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा. ही चौकशी व्हायला हवी. सत्य लोकांसमोर यायला हवं, असं राज ठाकरे ठाकरे म्हणालेत. राज्यात उद्योग यायला हवेत, असंही ते म्हणाले.
ट्विटरद्वारे देखील दिली होती प्रतिक्रीयाः
वेदांता प्रकल्पाबाबत राज ठाकरेंनी ट्विट करत देखील प्रतिक्रीया दिली होती. प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल त्यावेळी राज ठाकरे यांनी विचारला ट्विटमधून विचारला होता.
दरम्यान, वेदांता वर प्रतिक्रीया देणाऱ्या ट्विमध्ये हा सर्व प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असं देखील लिहिलं होतं.
महत्वच्या बातम्या :
- Nitin Deshmukh | “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, हे सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”
- Raj Thackeray | भाजप-मनसे युतीवर राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
- Eknath Shinde | शिंदेंनी दिला भाजपलाच धक्का! 100 हून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
- Devendra Fadnavis | सर्वांना सोबत घेऊन बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली – देवेंद्र फडणवीस
- Smartphone New Launch | लवकरच लाँच होणार Tecno POP 6 Pro ,लाँच पूर्वीच जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
