🕒 1 min read
मुंबई : राजकीय वादात सहभाग घेणारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावत हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने मोदींच्या जीवन यात्रेचं कौतुक देखील केलं आहे.
कंगना रणावत हिने नरेंद्र मोदी यांना दिल्या शुभेच्छाः
कंगनाने शेअर केलेला फोटो 2018 चा आहे, जेव्हा ती दिल्लीतील एका कार्यक्रमात गीतकार प्रसून जोशी यांच्यासह पंतप्रधान मोदींना भेटली होती. या फोटोमध्ये अभिनेत्रीने फुलांची साडी परिधान केली आहे. या कार्यक्रमात “मी मोदींच्या प्रवासामुळे त्यांची मोठी चाहती आहे. एक तरुण स्त्री म्हणून, मला विश्वास आहे की आपल्याकडे योग्य आदर्श असणं आवश्यक आहे, म्हणजे एका सामान्य माणसाचा आलेख आणि महत्त्वाकांक्षा तसेच जेव्हा जेव्हा आपल्याकडे चहा विकणारा पंतप्रधान असतो तेव्हा मी नेहमी म्हणते की हा त्यांचा विजय नसून तो आपल्या लोकशाहीचा विजय आहे, मला वाटते की मोदी योग्य आदर्श आहेत,” असं कंगना म्हणाली.

‘इमर्जन्सी’ या कंगनाच्या आगामी चित्रपटात कंगना दिवंगत इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे, अनुपम खेर जेपी नारायण, महिमा चौधरी पुपुल जयकर, श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आणि मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘इमर्जन्सी’चे लेखन आणि दिग्दर्शन कंगनाने केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती रेणू पिट्टी आणि कंगना यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद रितेश शाह यांचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Special Offer | ‘या’ प्रीमियम दर्जेदार साड्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Amezon वर उपलब्ध..जाणून घ्या!
- Ajit Pawar | “कित्येक दिवस तर ते दोघेच मंत्रीमंडळात होते…”; अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला
- NCP | “…असं शक्य झालं नाही, तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?”, राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
